Tuesday 22 October, 2013

Alibaug, Phansad, Murud Coastal Trail Diwali 2013



युथ होस्टेलतर्फे ‘ट्रेल सिंधुसागर’
युथ होस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मालाड युनिटतर्फे दिवाळीच्या सुट्टीत अलिबाग-फणसाड अभयारण्य, मुरुड या परिसरात ‘ट्रेक सिंधुसागर’ या कोस्टल ट्रेलचे आयोजन करण्यात आले आहे. 6ते 9 नोव्हेंबर या चार दिवस कालावधीच्या या ट्रेलमध्ये अलिबाग, कोरलाई किल्ला, काशीद किनारा, नांदगाव तसेच मुरुड किनारा,जंजिरा किल्ला, बिर्ला मंदिर, नागाव किनारा या ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत. अलिबाग परिसरातील नितांतसुंदर समुद्रकिनारे, कोरलाई आणि जंजिरा यांसारखे सागरी किल्ले तसेच फणसाड अभयारण्यात दिवसभराची भ्रमंती ही या ट्रेलची वैशिष्ट्ये आहेत. 

वय वर्षे ११ ते ६० या वयोगटातील सर्व निसर्गप्रेमींना यामध्ये सहभागी होता येईल.विशेषतः विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, निसर्गसंपदा यांची माहिती व्हावी, पर्यावरणाबद्दल जागरुकतावाढीस लागावी, तसेच त्यांच्यामध्ये साहसी वृत्तीची जोपासना व्हावी, या या उपक्रमाचा उद्देश आहे.
ना नफा तत्त्वावर पदभ्रमण मोहिमांचे आयोजन करणा या युथ होस्टेलच्या मालाड युनिटला यंदाच 25 वर्षे पूर्ण झाली असून या काळात संस्थेने सुमारे 700 यशस्वी मोहिमांचे आयोजन केले आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क वसंत घाडीगावकर 9892115188, अक्षय मुळ्ये 9819212975, कोमल गुप्ता 8652741652 , सुनील घरत 9969313045

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.